VIDEO | 101 वर्षांची 'माझी गोष्ट', डॉ. लीला गोखलेंशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

आज आपण अशा एका डॉक्टर आज्जींना भेटणार आहोत ज्यांनी जवळपास ८० वर्षांपूर्वी, जेव्हा मुलींना शिक्षण मिळणंही दुरापास्त होतं त्याकाळात मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजातून स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली.
त्यांचा सेवासदन शाळेतील विद्यार्थिनी ते स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर म्हणून झालेला प्रवास ‘माझी गोष्ट’ या आत्मकथनाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालीये.
आज लीला आज्जींचं वय १०१ वर्ष आहे. पण त्यांचा उत्साह, आणि जीवनाकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन अनेकांना प्रेरणा देतो.
डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर १९५३ ते १९८६ अशी छत्तीस वर्षे स्वतचे रुग्णालय चालवताना शहरातीलच नव्हे तर पुणे जिल्ह्य़ातील महत्त्वाच्या वैद्यकीय केंद्रांमधील रुग्णांना सेवा दिली.
रुग्णालय बंद केल्यानंतर महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी उपयुक्त संशोधनाला त्यांनी वाहून घेतले. आज एकशे एक वर्षे वयाच्या डॉ. गोखले यांनी वीणकाम, वाचन आणि पाककला अशा अनेक छंदांमध्ये स्वतला गुंतवून घेतले आहे.
तर तुमच्या आमच्या दिवसाची पॉझिटीव्ह आणि एनर्जेटीक सुरवात करुया लीला गोखलेंशी गप्पा मारुन

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola