ब्रेकफास्ट न्यूज : खगोलभौतिक शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा आज 80 वा वाढदिवस

Continues below advertisement
जगप्रसिद्ध खगोलभौतिक शास्त्रज्ञ व मराठी विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत विष्णु नारळीकर यांचा आज ८० वा वाढदिवस. खगोलभौतिक शास्त्रासारख्या अगम्य विषयात संशोधन करुन नारळीकरांनी हॉईल-नारळीकर सिद्धांत जगासमोर सादर केला. हा सिद्धांत नारळीकर यांनी त्यांच्या पीएचडीचे गाईड डॉ. फ्रेड हॉईल यांच्या साथीनं स्थिर स्थिती सिद्धांतावर संशोधन केलं आणि जगप्रसिद्ध बिग बँग सिद्धांताला आव्हान देणारा नवा सिद्धांत तयार केला. त्यानंतर डॉ. नारळीकरांनी लिखाणही चालूच ठेवलं. ज्यात त्यांनी साध्या भाषेत विज्ञानकथा लिहिल्या. त्यांची अंतराळातील भस्मासूर, अभयारण्य, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस ही पुस्तके गाजली. त्यांच्या यक्षांची देणगी या पहिल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram