ब्रेकफास्ट न्यूज पिंपरी चिंचवड: 50 वर्ष केवळ सायकलवरुन प्रवास करणाऱ्या आजोबांशी गप्पा
Continues below advertisement
आता आपण अशा एका आजोबांची भेट घेणार आहोत जे आजोबा गेली ५० वर्ष फक्त सायकलनेच प्रवास करतायेत. पिपंरीतले ७२ वर्षांचे गिरीजाप्पा हुच्चे दही विकण्याचा व्यवसाय करतात. रोज सकाळी दही आणायला पुण्यात जातात आणि दिवसभर दह्याची सायकलवरूनच विक्री करतात. आजोबा रोजच्यारोज किमान १०० किलीमोटरचं अंतर सायकलवरूनच पार करतात. इतकंच नाही तर २०० किलोमीटरच्या आतबाहेर एखादं लग्नकार्य असेल तरी आजोबा सायकललाच टांग मारतात आणि तिकडे जाऊन पोहोचतात.
----------
यात सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे आजोबांच्या घरातली सगळी मंडळी फोर व्हिलरने फिरतात. पण आजोबांना त्यांची सायकलच आरामदायी वाटते. त्यामुळे आजोबांना ना पेट्रोल दरवाढीची चिंता आहे ना त्यांच्या फिटनेसची.