ब्रेकफास्ट न्यूज : खासगी बस चालकांनी वाढीव तिकीट दर आकारल्यास कारवाई
Continues below advertisement
राज्य शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक तिकीट दर आकारणाऱ्या खासगी बस आणि ट्रॅव्हल्सविरोधात तक्रार करण्याचं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं. त्यासाठी त्यांनी मोटार वाहन विभागाचे क्रमांक तक्रारीसाठी दिले आहेत. 022 - 62426666 या क्रमांकावर राज्यभरातले प्रवासी निशुल्क तक्रारनोंदणी करु शकतात. तर मुंबईकर 1800220110 या क्रमांकावरही तक्रार करु शकतात. सोबतच transport complaints. maha online. gov.in या संकेतस्थळावरही तक्रार देऊ शकतात.
Continues below advertisement