ब्रेकफास्ट न्यूज : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात महाश्रमदान
Continues below advertisement
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत पानी फाऊंडेशनच्या पुढाकारानं राज्यभरात महाश्रमदान आयोजित करण्यात आलं आहे. राज्यातल्या 100 गावांमध्ये हजारो हात या अभियानाशी जोडले गेले आहेत. या महाश्रमदान अभियानासाठी सिनेकलाकारांची मोठी फौज मैदानात उतरली आहे. स्वतः आमिर खान मराठवाड्यातील लातूरच्या फत्तेपूर गावात श्रमदानासाठी उतरला. आमिरला या श्रमदानात साथ लाभली ती हायवे गर्ल आलिया भटची. पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातील वाघापूर गावात अभिनेता गिरीश कुलकर्णी, अमेय वाघ आणि अभिनेत्री ज्योती सुभाष श्रमदान करत आहेत. तर पुरंदरच्या सकलवाडीत अभिनेत्री सई ताम्हणकर श्रमदानासाठी पोहोचली.
Continues below advertisement