ब्रेकफास्ट न्यूज : नागपूर : महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक मध्यरात्री विधानसभेत मंजूर

Continues below advertisement
महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक विधानसभेत रात्री उशिरा मंजूर करण्यात आलं. मात्र, या विधेयकावरुन चांगलचं राजकारण तापतंय. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरातील अनधिकृत बंगला वाचवण्यासाठी सरकारने रात्री उशिरा हे विधेयक मंजूर केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या विधेयकानुसार महानगरपालिका किंवा नगरपालिका प्रमुख अर्थात आयुक्तांना मालमत्तेची भाडेपट्टी मुदत वाढवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अग्निशमन दलासाठी आरक्षित जागेवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बंगला बांधल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram