VIDEO | ISIS संबंधांवरुन अटकेत असलेले 9 जण रासायनिक हल्ला करणार होते? | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
Continues below advertisement
मुंब्रा, औरंगाबाद येथून अटक करण्यात आलेले 9 संशयीत मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. कुंभमेळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी नदीच्या पाण्यात केमिकल मिसळून मोठा घातपात घडवण्याचा कट होता,अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासातून पुढे आली आहे.
हायड्रोजन पॅराॅक्साईडसह इतर रसायनांचं मिश्रण अन्नपदार्थ आणि पाण्यात मिसळण्याचा त्यांचा कट होता. एटीएसने पकडलेल्या 9 जणांना औरंगाबाद कोर्टात हजर केलं. त्यावेळी एटीएसने कोर्टासमोर ही माहिती दिलीय. या 9 जणांना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आलीय... या 9 जणांमध्ये फार्मासिस्ट, इंजिनीअर तसेच उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे.
तसेच यातील एक आरोपी अंडरवर्ल्ड डॉन राशिद मलबारीचा मुलगा असल्याचं समोर आलंय.