ब्रेकफास्ट न्यूज : 'वॉलमार्ट' 15 अब्ज डॉलरमध्ये 'फ्लिपकार्ट'ला विकत घेणार
वॉलमार्ट ही जागतिक ई-कॉमर्स क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी कंपनी 'फ्लिपकार्ट' या भारतीय कंपनीला विकत घेणार आहे. अॅमेझॉनला ‘काँटे की टक्कर’ देण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याची माहिती आहे. 15 अब्ज डॉलरमध्ये हा व्यवहार झाल्याचं म्हटलं जातं. वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाउज मॅकमिलन हे भारतात आले आहेत. आज या कराराबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.