ब्रेकफास्ट न्यूज : विश्वास(घात) दर्शक ठराव, बहुमताची झुंडशाही : सामना
Continues below advertisement
स्पष्ट बहुमत असलेल्या मोदी सरकारची आज संसदेमध्ये परीक्षा होणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून तेलगू देसमनं आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला सरकार सामोरं जातंय. सकाळी अकरा वाजल्यापासून पुढील 7 तास प्रस्तावावर चर्चा होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदींचं भाषण आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या मतदानात भाजपसोबत कोण आणि विरोधात कोण, हे स्पष्ट होईल. दरम्यान मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरुन शिवसेनेने मुखपत्र सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
Continues below advertisement