ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची 'मातोश्री'वर बैठक

Continues below advertisement
यंदा पहिल्याच पावासात मुंबईतल्या अनेक ठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईतल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. यात उद्धव ठाकरे नगरसेवकांना मार्गदर्शन करतील. याशिवाय मुंबई शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांसंदर्भातही या बैठकीत महत्वाची चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram