ब्रेकफास्ट न्यूज : एसटी महामंडळातील कनिष्ठ वेतनश्रेणी पद्धत रद्द
Continues below advertisement
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी कनिष्ठ वेतनश्रेणीची पध्दत आता रद्द करण्यात येणार आहे. अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या १ वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. या काळात कमी वेतनामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. या कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा लक्षात घेता कनिष्ठ वेतन श्रेणीची पद्धती रद्द करण्यात येईल. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल,असं रावते यांनी सांगितलंय.
Continues below advertisement