ब्रेकफास्ट न्यूज : एसी रेल्वेपेक्षा विमानाने प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ
रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपेक्षा विमानानं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, असं मोदी सरकारने म्हटलं आहे. हवाई वाहतुकीमध्ये भारताने गेल्या 3 वर्षात 18 ते 20 टक्क्यांनी प्रगती केली आहे, असा दावा मोदी सरकारने केला आहे. सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकांचा कल एसी ट्रेननं प्रवास करणाऱ्यांपेक्षा विमानानं प्रवास करण्याकडे अधिक आहे. 2017 मध्ये 10 कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी डोमेस्टिक फ्लाईट्सना पसंती दिल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणून हवाई वाहतुकीत जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिलं जात असल्याचं सरकारने म्हटलं आहे.