ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईतील रस्त्यांच्या दूरवस्थेवर मार्मिक टीका; महेश टिळेकर, स्मिता शेवाळेशी बातचीत
Continues below advertisement
पावसाळ्याच्या आधी रस्त्यांसंदर्भात दिलेली आश्वासनं खड्ड्यात कधी वाहून गेली कळलंच नाही. मग सामान्य माणसाने तक्रारी करुन झाल्या, चिडून झालं, अगदी खड्ड्यात पडून मरूनही झालं. पण ना प्रशासनाला जाग येते.. ना मुंबई पालिकेला.. हे चित्र मुंबई पुरतंच नाहीये तर राज्यभरातल्या प्रमुख शहरात थोड्याफार फरकानं हेच चित्र आहे. अजून किती बळी गेले की प्रशासन खरी आश्वासनं देणार हा उद्विग्न प्रश्न विचारुन सामान्यही थकून गेला.
आता या खड्ड्यांवर विविध कविता, टीकात्मक गाणी सोशल मिडियावर व्हायरल व्हायला लागली आहेत. ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे, दिग्दर्शक महेश टिळेकर, अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अभिनेत्री स्मिता शेवाळे या चौघांचा असाच एक उद्विग्नतेतून तयार झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विनोदी पद्धतीने मार्मिक टीका करत गंभीर विषय राजकारण्यांना सुनावला तर त्यातून बदल व्हायचे ही महाराष्ट्राची परंपरा होती. आता या नव्या व्हिडीओमधून खडड्यांचा प्रश्न, आणि प्रशासनाचा ढिसाळपणावर कलाकार भाष्य करत आहेत. यानिमित्ताने महेश टिळेकर आणि स्मिता शेवाळे यांच्याशी आपल्याला बातचीत करायची आहे. पण त्याआधी या व्हिडीओची एक झलक पाहूयात