ब्रेकफास्ट न्यूज : सायबर हल्ल्यापासून कसं वाचायचं? सायबर एक्सपर्ट अमोल ठाकरे यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
तंत्रज्ञान बदलतंय, मागच्या काही वर्षात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला. जितका त्याचा फायदा झाला, तितकंच इंटरनेटच्या महाजालाची मोठी किंमत मोजावी लागत आहे. हे सांगायचं कारण म्हणजे नवी मुंबईच्या MGM रुग्णालयावर झालेला सायबर हल्ला झाला. रॅन्समवेअर या व्हायरसचं नाव पुन्हा एकदा या हल्ल्यामुळे चर्चेत आलं आहे. रविवारी रात्री अचानकपणे वाशीतील MGM रुग्णालयातील संगणक प्रणाली ठप्प झाली. काही वेळातच हा सायबर हल्ला असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आलं.
या सायबर हल्ल्यात रुग्णालयाचा गेल्या 15 दिवसांचा डेटा चोरीला गेला आहे. अज्ञात व्यक्तीने तिथली संपूर्ण संगणकीय यंत्रणा ठप्प करून सायबर हल्ला झाल्याचा संदेश संगणकारवर दिला. तसेच या हल्ल्यातून सुटकेसाठी खंडणीचीही मागणी केली.
याप्रकरमी रुग्णालय प्रशासनाकडून गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार देण्यात आलेली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करता आहेत. पण गेल्या काही दिवसात वाढलेले सायबर हल्ले, आणि आगामी काळाक सायबर वॉरचा वाढणारा धोका या पार्श्वभूमीवर सायबर हल्ल्यापासून कसं वाचायचं याविषयी आज आपण बातचित करणार सायबर एक्सपर्ट अमोल ठाकरे यांच्याशी