ब्रेकफास्ट न्यूज : आंध्रप्रदेशात आकाशपाळण्याची क्लिप तुटली, 8 जण हवेत फेकले गेले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2018 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आकाशपाळण्यात बसण्याची हौस नवी नाही. त्यामुळेच गावोगावच्या जत्रांमध्ये आणि शहरातील फेअर वर्ल्डमध्ये
आकाशपाळण्यांभोवती प्रचंड गर्दी असते. अगदी रांगेत उभं राहून लोक तिकीट काढून आकाशपाळण्यात बसतात. पण हीच हौस आंध्रातल्या अनंतपूरच्या आठ जणांच्या जीवावर बेतली. कारण आकाशपाळणा वेगाने फिरत असताना त्यातील एक-दोन क्लिप तुटल्या आणि आठ जण फेकले गेले. यात आठ वर्षाच्या अमृता नावाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंगावर काटा आणणारी ही दृश्यं एका तरुणाच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहेत.