ब्रेकफास्ट न्यूज: लाईव्ह कार्यक्रमात गिरीश महाजनांचे पुशअप्स, पंकजा मुंडेंना चॅलेंज
Continues below advertisement
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोशल मीडियावरुन ‘फिट इंडिया’ मोहिम सुरु केली आहे. त्यासाठी स्वत: व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर व्यायाम करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करा, असं आवाहन करत, राज्यवर्धनसिंह राठोड यांनी विविध सेलिब्रिटींना चॅलेंज दिलं. ही मोहिम चांगलीच चर्चेत आहे.
आधी सायना नेहवाल, मग हृतिक रोशन, विराट कोहली या मंडळींनी आपला फिटनेस दाखवत थेट पंतप्रधानांना चॅलेंज दिलं. आणि पंतप्रधानांनीही हे आव्हान स्वीकारलं. आता थेट पंतप्रधानंच चॅलेंज स्विकारत आहेत म्हणल्यावर आपल्या राज्यातले मंत्री किती फीट आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढणं स्वाभाविक आहे.
म्हणूनच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फिटनेस फंडा काय, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न
Continues below advertisement