ब्रेकफास्ट न्यूज : नेटकऱ्यांची फेव्हरेट 'सोटी पोरगी' अर्थात निधी देशपांडेशी गप्पा
Continues below advertisement
आजच्या इंटरनेटच्या दुनियेत तुम्हाला तुमची कला किंवा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. यू ट्यूब एक असं प्रभावी माध्यम बनलंय की फारशा साधनसामग्रीचा वापर न करता तुमच्या कलेच्या आणि इनोव्हेशनच्या जोरावर तुम्ही इंटरनेट सेंसेशन होऊ शकता. यू ट्यूबर सध्या अशीच एक 'सोटी पोरगी' अर्थात निधी देशपांडे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची फेव्हरेट बनली आहे स्पेशल भिंगाचा आणि अॅपचा वापर करत निधीने पोस्ट केलेले लहान मुलीच्या आवाजातले निधीचे व्हिडीओज सगळेच खूप एन्जॉय करतात.
निधीने खरंतर मायक्रोबायोलॉजीत एमएससी केलंय आणि काही काळ प्राध्यापक म्हणूनही काम केलं. पण सोटी पोरगीचा पहिला व्हिड़ीओ निधीने 28 मे 2017 ला युट्यूबवर अपलोड़ केला आणि त्यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही. आजवर निधीने 55 व्हिड़ीओज अपलोड़ केलेत आणि तिच्या युट्यूबच्या फाॅलोअर्सची संख्या 37 हजार इतकी आहे. मिसेस ड़ेली सोप हा तिचा नवा प्रयोगही तिच्या चाहत्यांची वाहवा मिळवून देतोय.