Breakfast News | मुस्लीम महिलांच्या हक्कांसाठी लढणारे समाजसुधारक सय्यदभाई यांच्याशी बातचीत | ABP Majha
Continues below advertisement
आज आपण अशा एका समाजसुधारकाशी बातचित करणार आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी, तीन तलाक या जुलमी प्रथेच्या बळी पडलेल्या महिलांच्या संरक्षणासाठी, आणि मुस्लीम धर्मातील सुधारणांसाठी. आज आपल्यासोबत असणार आहेत सय्यदभाई. तिहेरी तलाक विधेयक संसदेच्या दोन्हीही सभागृहात अखेर मंजूर झालं. आणि इतकी वर्ष लढा देणाऱ्या सय्यदभाईंची, हाच दिवस मुस्लीम महिलांसाठी ईद आणि स्वातंत्र्यदिन ही पहिली प्रतिक्रिया व्यक्त झाली.
18 वर्षांच्या आपल्या बहिणीला तीन तलाकचा सामना करण्याची आलेली वेळ पाहूयात सय्यदभाईंना त्यांच्या तरूणपणीच तिहेरी तलाक प्रथेचा घातक विळखा कळला होता. त्यानंतर मुस्लीम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सुरू झालेल्या मोठी चळवळ उभी राहिली. आणि इतक्या वर्षांनी या अघोरी जोखडामधून मुस्लिम महिलांना हक्क मिळण्याचा मार्ग दिसू लागला आहे.