VIDEO | 2019 च्या सर्वात तरुण उद्योजकाचा मान, अवघ्या 16 वर्षात अर्जुन देशपांडे कसा झाला उद्योजक? | ABP Majha
Continues below advertisement
आज आपल्यासोबत आहे देशातला एक अत्यंत तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे. अर्जुन अवघा १६ वर्षांचा आहे. कॉलेजात जाऊन मजामस्ती करण्याच्या वयात त्याने २०१९ चा यंगेस्ट स्टुडन्ट आन्थ्रप्रेन्युअर ऑफ दी इयरचा पुरस्कार मिळालाय. . जेनिरीक आधार या आपल्या ब्रँड अंतर्गत समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना कमीत कमी दरात चांगली औषधं उपलब्ध करुन देण्याचा अर्जुनचा प्रयत्न आहे.
मोठमोठ्य़ा औषध कंपन्या ग्राहकांकडून स्वस्त औषधांसाठीही अव्वाच्या सव्वा पैसे उकळतात. पण ही लूट थांबवण्य़ासाठी अर्जुन आता प्रयत्नशील आहे.
लहान असल्यापासून अर्जुन त्याच्या आईसोबत अमेरिका, चायना. व्हिएतनाम. दुबई यासारख्या देशात गेलेला असताना त्याच्या लक्षात आलं की या देशात नागरिकांना औषधं खूप स्वस्त दरात उपलब्ध होतात. पण भारतात याच औषधांच्या मार्केटींग आणि ब्रँडींगवर होणाऱ्या मोठ्या खर्चामुळे मुळातच स्वस्त असलेली औषधं रुग्णांना चढ्या दरानं खरेदी करावी लागतात. आता हेच चित्र बदलण्यासाठी अर्जुन प्रयत्नशील आहे.
आज या तरुण उद्योजकाशी गप्पा मारुन त्याच्याविषयी जाणुन घेऊया.