ब्रेकफास्ट न्यूज : अविश्वास ठराव : लोकसभेत आज मोदी सरकारची परीक्षा

Continues below advertisement
स्पष्ट बहुमत असलेल्या मोदी सरकारची आज संसदेमध्ये परीक्षा होणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून तेलगू देसमनं आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला सरकार सामोरं जातंय. सकाळी अकरा वाजल्यापासून पुढील 7 तास प्रस्तावावर चर्चा होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदींचं भाषण आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या मतदानात भाजपसोबत कोण आणि विरोधात कोण, हे स्पष्ट होईल. अविश्वास प्रस्तावावर भाजपला साथ द्यायची की विरोध करायचा यावरुन शिवसेनेचं मात्र तळ्यात मळ्यात सुरु आहे. शिवसेनेनं अद्याप कुठलीही भूमिका घेतली नाही. सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावं. ज्यावेळी शिवसेनेची संसदेत भूमिका मांडण्याची वेळ येईल. त्यावेळी उद्धव ठाकरे आपल्या खासदारांना भूमिका कळवणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram