ब्रेकफास्ट न्यूज : महाभियोग प्रस्ताव फेटाळल्याविरोधातील याचिकेवर सुनावणी
Continues below advertisement
सरन्यायाधीश दिपक मिस्रा यांच्याविरोधात महाभियोग चालविण्यासाठी दिलेली नोटीस राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंनी फेटाळली. त्या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यासाठी पाच न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं आहे. काँग्रेससह सात विरोधी पक्षांच्या 64 राज्यसभा सदस्यांनी 20 एप्रिल रोजी सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोग चालविण्याची नोटीस दिली होती. राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी 23 एप्रिल रोजी ती फेटाळली. त्याविरुद्ध नोटीस देणाऱ्यांपैकी प्रताप सिंग बाजवा आणि डॉ. अमी हर्षद्रेय याज्ञिक या काँग्रेसच्या दोन सदस्यांनी याचिका दाखल केली आहे.
Continues below advertisement