ब्रेकफास्ट न्यूज : माऊलींच्या अंगणात खेळलेल्या कार्तिकी गायकवाडशी गप्पा
Continues below advertisement
सध्या वारीचा प्रवास सुरू आहे. अभंगाचे स्वर कानी पडत पंढरीकडे प्रस्थान करणं यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही. पण जे प्रत्येक्ष या वारीत सहभागी होऊ शकत नाहीएत त्यांचा हिरमोड होण्याचं कारण नाही. कारण आज आपण गप्पा मारणार आहोत आळंदीतल्या अशा एका गायिकेशी जीच्या आवाजाची जादू संपूर्ण महाराष्ट्रानं सारेगमप लिटील चॅम्पच्या पर्वात अनुभवली आहे.अर्थात आम्ही बोलतोय गायिका कार्तिकी गायकवाडबद्दल. वारी संप्रदाय, वारकरी परंपरा अशा वातावरणात लहानाची मोठी झालेल्या कार्तिकीचा सांगितीक प्रवास अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आहे, अनुभवला आहे.
-----------
कार्तिकीच्या या स्वरप्रवासात तिचे संगीतकार वडिल कल्याणजी गायकवाड यांचं योगदान मोठं आहे. खास वारकऱ्यांसाठी तिच्या वडिलांनी निर्माण केलेलं स्वरधन कार्तिकीने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. आज विठुरायाच्या भेटीच्या ओढीने वारकरी पंढरीच्या दिशेन मार्गस्थ होत असताना माऊलींच्या अंगणात खेळलेली आणि माऊलींचा आशीर्वाद लाभलेली कार्तिकी गायकवाड तिच्या सूरांची बरसात करायला आपल्यासोबत आहे.