Breakfast News | क्रिकेट वर्ल्ड सीरिजचं जेतेपद पटकावणाऱ्या स्पेशल शिलेदारांशी गप्पा | ABP Majha

Continues below advertisement
टीम इंडियाचं आयसीसी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न यंदा अधुरं राहिलं, पण त्याच इंग्लंडच्या भूमीत इंग्लंडला हरवून वर्ल्ड सीरिजचं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न आपल्या विशेष टीमनं साकार केलं. ही टीम आहे भारताच्या दिव्यांग खेळाडूंची. या शिलेदारांनी आपल्या शारीरिक आव्हानांवर मात करुन दिव्यांगांच्या ट्वेन्टी 20 वर्ल्ड सीरिजचं विजेतेपद पटकावलं. मूळचा पालघरमधल्या बोईसरचा असलेल्या विक्रांत केणीच्या नेतृत्वाखाली या खेळाडूंनी इतिहास घडवला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 36 धावांनी धुव्वा उडवला. या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी माजी रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी यांच्याकडे होती. या टीमचा कर्णधार विक्रांत केणी आणि त्याच्या फौजेचे बिनीचे शिलेदार कुणाल फणसे आणि रवींद्र संथे यांच्यासोबत मारलेल्या गप्पा.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram