ब्रेकफास्ट न्यूज : ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगाव मुक्कामी, चांदोबाचा लिंब गावात रिंगण सोहळा
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज तरडगाव मुक्कामी असणार आहे. आज सकाळी पालखी लोणंदहून मार्गस्थ झाली आहे. दुपारी २ वाजता चांदोबाचा लिंब गावात रिंगण सोहळा पार पडणार आहे. दुसरीकडे तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीहून निघून काटेवाडी गावात मुक्कामी असणार आहे. काटेवाडी गावात परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात येईल. टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होत वारकऱ्यांचा पंढरपूरच्या दिशेनं प्रवास सुरु आहे.