ब्रेकफास्ट न्यूज : पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट, काही भागात अवकाळीचीही शक्यता
Continues below advertisement
पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय तर
चंद्रपुरात काल तब्बल 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपुरातील हे तापमान काल जगातील सर्वाधिक होतं.
काही भागात उष्णतेची लाट असली तरी विदर्भाच्या काही पट्ट्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यताही मुंबई हवामान विभागानं वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, सातारा, कोल्हापुरात पावसाच्या सरी बरसल्यात...
दरम्यान सांगली जिल्ह्यातील तासगावात मंगळवारी झालेल्या तुफान गारपिटीनंतर भीषण वास्तव समोर आलंय. या गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. गारांच्या माराने द्राक्षबागांची पाने गळून पडली असून काड्याही मोडून पडल्या आहेत. तासगावाच्या येवाळी परिसराचील दोन हजार एकरातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय.त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधींचे नुकसान होण्याची भीती आहे.