ब्रेकफास्ट न्यूज : वसई-विरार, नालासोपाराचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
Continues below advertisement
वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात पावसानं उसंत घेतली असली, तरी शहरातल्या अनेक भागातील पाणी ओसरलेलं नाहीए... इथलं विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतंय... कारण, ३० तास खंडीत करण्यात आलेला वीजपुरवठा अखेर काल संध्याकाळी ५ वाजता पूर्ववत झालाय. दरम्यान ३० तास लाईट नसल्यानं लोकांनी मोबाईल चार्जिंगसाठी स्टेशनचा आधार घेतला. त्यामुळे स्टेशन परिसरात मोबाईल चार्च करण्यासाठी गर्दी जमलेली दिसली. बत्ती गुल झाल्यानं अनेकांचे मोबाईल बंद झाले होते...तर, सोसायट्यांमधल्या मोटर बंद पडल्यानं इतका पाऊस पडूनही अऩेकांना तळमजल्यावरुन पाणी भरावं लागलं
Continues below advertisement