ब्रेकफास्ट न्यूज : उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; पावसामुळे घराचं नुकसान
उत्तराखंडात जोरदार पाऊसमुळे ढगफुटी झाली आहे. चमोली भागात ही ढगफुटी झाली आहे. चमोली जिल्ह्यातील नारायणबगडमध्ये ढगफुटीमुळे दुकानांचं आणि घरांचं नुकसानही झालं आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान पावसामुळे दरड कोसळल्याने कर्णप्रयाग-ग्वालदम हायवे काही काळ बंद होता. वातावरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण पसरलं आहे.