ब्रेकफास्ट न्यूज : तेजस ठाकरेंकडून खेकड्याच्या आणखी 11 प्रजातींचा शोध
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी आणखी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा हा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला आहे.
तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही खेकड्यांच्या काही प्रजातींचा शोध लावला आहे.
न्यूझीलंडच्या ‘झुटाक्सा’ हे नियतकालिक आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांविषयी दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील 'सह्याद्री' या रांगड्या मराठी नावावरुन एका खेकड्याचं 'सह्याद्रियाना' असं नामकरण करण्यात आलं आहे.