ब्रेकफास्ट न्यूज : दिवंगत चित्रकार तय्यब मेहतांच्या 'काली' पेटिंगची 26 कोटींना विक्री
दिवंगत चित्रकार तय्यब मेहता यांच्या एका चित्राची तब्बल 26 कोटींना विक्री झाली आहे. तय्यब मेहता यांनी 1989 साली रेखाटलेलं 'काली' नावाचं हे पेंटिंग आहे. मेहता यांच्या ह्या पेंटिंगची 26 कोटींना विक्री झाल्याने त्यांच्याच एका पेंटिंगचा रेकॉर्ड मोडला आहे. मे 2017 मध्ये तय्यब मेहता यांचं 'वूमन इन रिक्षा' हे पेंटिंग 22.99 कोटींना विकलं गेलं होते. तय्यब मेहता हे मुंबईतल्या प्रसिद्ध जेजे स्कूल ऑफ आर्टसचे माजी विद्यार्थी होते. 2009 मध्ये मेहता यांचं निधन झालं होतं.