ब्रेकफास्ट न्यूज : आठवडाभर सुरु असलेला वाहतूकदारांचा संप अखेर मागे, गडकरींचं ट्वीट
Continues below advertisement
गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप अखेर मागे घेण्यात आलाय. मालवाहतूकदारांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. इंधनाचे दर कमी करावे, टोलधोरण, थर्ड पार्टी इन्स्यूरन्स यांसह अनेक मागण्यांसाठी देशभरातील खासगी मालवाहतूकदार संघटनेनं हा बेमुदत संप पुकारला होता. या संपामुळे हजारो कोटींचं नुकसान झालं आहे. त्यासोबतच विविध मार्केट कमिट्यांमधील अन्नधान्य, भाजीपाल्याची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही ऑल इंडिया मोटार काँग्रेसचा संप मागे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं म्हटलंय.
Continues below advertisement