ब्रेकफास्ट न्यूज : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास भारत 'हिंदू पाकिस्तान' बनेल : शशी थरुर
Continues below advertisement
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यास देशाचा हिंदू पाकिस्तान होईल, असा वादग्रस्त दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी केला आहे. तिरुअनंतपुरममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 'भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास नव्यानं घटना लिहिली जाईल. त्यामुळे भारतामधील परिस्थिती पाकिस्तानसारखी होईल. मग या देशात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा कोणताही सन्मान केला जाणार नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. थरुर यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement