ब्रेकफास्ट न्यूज : भाजपचं सरकार मंत्री चालवतात की अधिकारी, शिवसेनेच्या अधिकाऱ्यांचा थेट सवाल

Continues below advertisement
मंत्र्यांनी सांगितलेली कामं अधिकारी करत नाहीत. हे सरकार मंत्री चालवतात की अधिकारी. असा संतप्त सवाल दुसरा तिसरा कोणी नाही तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांनी विचारलाय.
काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरिष्ठ मंत्र्यांनी याप्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती केली.
काल बैठकीसमोरील विषय संपल्यानंतर मंत्र्यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी त्याची सुरुवात केली. त्याला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही पाठींबा दिला. ऐवढंच नाहीतर भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही अधिकार्यांमुळे सरकारच्या गतीमानतेवर परिणाम होत असल्याचा आरोप केला.
महादेव जानकर, बबनराव लोणीकर यांनीही सरकारी कारभाराचे वाभाडे काढले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram