ब्रेकफास्ट न्यूज : पालघरमध्ये एका रात्रीत 82 हजार मतं कशी वाढली? : शिवसेना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2018 10:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत 6.72 टक्के मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’त त्याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
पालघरमधील मतदान पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि बूथवरील माहिती गोळा केली. त्यानंतर एकूण 46.50 टक्के इतकं मतदान झाल्याचं जाहीर केलं.