ब्रेकफास्ट न्यूज : 'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी सोबत गप्पा
काही नाटकं, काही कलाकृती अशी असतात ज्या रंगभूमीला कायमस्वरुपी योगदान देतात. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर असंच एक नाटक प्रेक्षकांची दाद मिळवतंय, ते म्हणजे संगीत देवबाभळी. एका संगीतिकेपासून सुरु झालेल्या या नाटकाचा प्रवास आता व्यावसायिक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकानं पटकावला. सेलिब्रेटी कलाकारापेक्षाही कथानक, संगीत आणि दर्जेदार अभिनय हाच नेहमी जमेच्या बाजू असतात हे वारंवार सिद्ध करणाऱ्या या नाटकातल्या दोन माऊली आपल्यासोबत आहेत. रखुमाई-आवली - अर्थात मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते.