ब्रेकफास्ट न्यूज : नाणार प्रकल्प लादून दाखवाच - शिवसेना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रत्नागिरी जिल्ह्यातील वादग्रस्त नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील दरी वाढतच चालली आहे. शिवसेनेने मुखपत्र सामनामधून पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला आहे. “नाणारचा प्रकल्प हे जहर आहे आणि तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे आहे. कोकणची जनता सुखी आहे, त्यांच्या सुखात विष कालवू नका. जर असा प्रयत्न भाजपकडून झाला तर कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्यात माती खायला लावू” अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे.