ब्रेकफास्ट न्यूज : नाणार प्रकल्पाच्या करारावर दिल्लीत स्वाक्षरी

Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमधील प्रस्तावित प्रकल्पाला विरोध आहे. मात्र हा विरोध असतानाही ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी आज सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी आज सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर  आणि संयुक्त अरब अमीरात (युएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram