ब्रेकफास्ट न्यूज : भाजप पुन्हा 'जय श्रीराम'चा नारा, रेल्वे मंत्रालयाकडून 'श्री रामायण एक्स्प्रेस' सेवा
Continues below advertisement
2019 च्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देण्याची शक्यता आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयानं 'श्री रामायण एक्स्प्रेस' सुरु करण्याचा निर्णय़ घेतलाय. १४ नोव्हेंबरपासून दिल्लीवरुन ही रेल्वे सेवा सुरु होईल. रामायणातील महत्वाच्या स्थळांना जोडणारी १६ दिवसांची यात्रा असणार आहे. यात अयोध्या, नंदीग्राम, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रृंगवेरपूर, चित्रकुट, हंपी, नाशिक, रामेश्वरम असा ठिकाणांचं पर्यटकांना दर्शन घेता येईल. रामेश्वरम् पर्यंतच्या प्रवाससाठी 15 हजारांचा खर्च अपेक्षित आहे.
Continues below advertisement