ब्रेकफास्ट न्यूज : पुणे : उंची वाढवण्यासाठी चक्क जॅक लावून उचलला बंगला!

Continues below advertisement
पुण्यातल्या तारदत्त कॉलनी या भागात असणारा 2000 स्केअर फूटाचा बंगला चक्क जॅक लावून उचलला गेला. बंगल्याची उंची वाढवण्यासाठी हा सारा खटाटोप करण्यात आला. घरासमोर वर्षानुवर्ष रस्त्याची दुरुस्ती होत राहिली की रस्त्यांची उंची वाढते.  त्यामुळे घराची उंची रस्त्यांच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे या बंगल्याच्या मालकांना बंगल्याची उंची वाढवून रस्त्यांच्या लेव्हलला आणायची होती. 'हाऊस लिफ्टिंग' असं या तंत्रज्ञानाला म्हटलं जातं. इमारत किंवा कोणत्याही बांधकामाच्या पायात शेकडो जॅक बसवून हे काम शक्य केलं जातं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram