ब्रेकफास्ट न्यूज : जुने कपडे द्या, नव्या वस्तू घ्या; पुण्यातील स्वप्निल जोशीचा अनोखा प्रयोग

Continues below advertisement
तुमचे जुने कपडे द्या, आणि त्याबदल्यात तुमच्याच कपड्यांपासून तयार झालेल्या बॅग्स घरी न्या. अशी ऑफर आली तर कोणाला आवडणार नाही. पुण्यातल्या स्वप्नील जोशी या तरूणानं असाच एक अनोखा प्रयोग दोन वर्षांपासून सुरु केला आहे. इको रिगेन असं त्याच्या प्रयोगाचं नाव आहे. तुमच्या जुन्या कपड्यांपासून बॅग्ज, वॉलेट्स, कपड्यांची कॅरी बॅग, डोअर मॅट, चादर, ट्रॅव्हल बॅग अशा विविध वस्तू तुम्ही तयार करुन घेऊ शकता.

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होण्याआधीपासूनच स्वप्निलने हा उपक्रम सुरु केला होता. आता त्याची पाच जणांची टीम आहे. किलोवर जुने कपडे देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी तयार करुन घेणं, यामुळे महिला वर्ग तर नक्की खूश आहे. तर आज या प्रयोगाविषयी सांगायला स्वप्निल आपल्यासोबत आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram