ब्रेकफास्ट न्यूज: खासगी वाहतूकदारांच्या संपाचा आज चौथा दिवस

Continues below advertisement
खासगी वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. सातत्यानं वाढत असलेल्या इंधनाच्या दरवाढीविरोधात खासगी वाहतुकदार आक्रमक झाले आहेत. या वाहतुकदारांकडून देशभरात चक्काजाम केला जातोय. संपात खासगी ट्रक मालक-चालक, बस चालक-मालक, टेम्पो आणि कॅबनं सहभाग नोंदवलाय. दरम्यान या संपाचा कोणताही परिणाम नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर होत नाही. सकाळपासून भाजीपाल्याच्या 550 गाड्यांची आवक मार्केटमध्ये झाली आहे. दरम्यान आज एकादशी असल्यानं मालाला उठाव नाही, त्यामुळं मागणीही कमी आहे. त्यामुळं भाजीपाल्यांचे दर स्थिर असलेले बघायला मिळतायत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram