ब्रेकफास्ट न्यूज : प्रणवदांच्या रेशीमबाग भेटीनंतर नव्या स्वयंसेवकांची संख्या चौपटीने वाढली!

Continues below advertisement
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पश्चिम बंगालमधून संघात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. एक जून ते सहा जून दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होण्यासाठी इच्छुकांची संख्या सरासरी दररोज 378 अर्ज प्राप्त होत आहेत. सध्या सर्वात जास्त अर्ज हे पश्चिम बंगालमधून आले आहेत.

7 जून रोजी आमच्या शिक्षा वर्गाला प्रणव मुखर्जी यांनी संबोधित केल्यानंतर आम्हाला 1779 अर्ज मिळाले आहेत. 7 जूननंतर आम्हाला दररोज 1200-1300 अर्ज येत आहेत. यातील 40 टक्के अर्ज हे बंगालमधील आहे, अशी माहिती संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विप्लव रॉय यांनी दिली.

मुखर्जींच्या भाषणानंतर संघाची लोकप्रियता वाढली का, असा सवाल त्यांना विचारला असता ते म्हणाले की, अशी व्याख्या करणे योग्य ठरणार नाही. मुखर्जी यांच्यामुळे संघाची स्वीकार्यता मात्र वाढली असल्याचे ते म्हणाले.

आपल्या कार्यामुळे संघ लोकप्रिय आहे. परंतु, मुखर्जींच्या भाषणामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. हे एक त्यामागील प्रमुख कारण असू शकते, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram