VIDEO | पोलीस निरीक्षक माछरेंच्या निलंबनासाठी मोर्चा, 300 वारकऱ्यांवर गुन्हा | परभणी | एबीपी माझा

परभणीत वारकरी आणि पोलिसांमधील वाद विकोपाला गेलाय. पोलिस निरीक्षकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या ३०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गंगाखेडमध्ये पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी रात्री १० वाजता कीर्तन बंद केलं होतं. त्य़ानिषेधार्थ पोलिस निरीक्षक माछरे यांच्या निलंबनासाठी वारकऱ्यांनी मोर्चा काढला होता. पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही विनापरवाना मोर्चा काढला, शिवाय पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकऱणी ३०० जणांवर गुन्हा नोंदवला गेलाय. त्यात खासदार संजय जाधव, रासप नेते रत्नाकर गुट्टे, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांचाही समावेश आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola