ब्रेकफास्ट न्यूज: पंढरपूर: हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला महापूजेचा मान
Continues below advertisement
टाळ-मृदंगाच्या जयघोषणात विठूरायाची नगरी पंढरपुर दुमदुमली आहे. आज जवळपास 15 लाख वारकरी पंढरीत विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. प्रथेप्रमाणे आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्र्य़ांच्या अनुपस्थितीत यंदा पूजेचा मान हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली.
Continues below advertisement