ब्रेकफास्ट न्यूज : पालघर : अशोक चव्हाणांच्या सभेसाठी चार हजार खुर्च्या, केवळ 500 लोक

Continues below advertisement
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित अशोक चव्हाणांच्या सभेत जेम-तेम ५०० लोकच जमू शकली. महत्वाचं म्हणजे सभेसाठी आयोजकांनी तब्बल ४ हजार खुर्च्या मांडल्या होत्या. मात्र पदाधिकाऱ्यांसह मोजकेच लोक जमल्यानं आयोजकांवर टाकलेल्या खुर्च्या परत नेण्याची वेळ आली. त्यानंतर फकत् १५ मिनिटातच चव्हाणांनी सभा आटोपती घेतली. मात्र आपल्या भाषणात चव्हाणांनी पालघरमध्ये काँग्रेसच जिंकणार असा दावा केला.  चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये खासदारीकीची निवडणूक होतेय. शिवसेनेनं चिंतामन वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा, भाजपनं काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावितांना तर काँग्रेसनं दामोदर शिंगडा यांना उमेदवारी दिलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram