ब्रेकफास्ट न्यूज : पालघर पोटनिवडणूक : मतदान केंद्रांवरील परिस्थिती

Continues below advertisement
बहुजन विकास आघाडीचा उमेदवार पराभूत व्हावा यासाठी भाजपच्या दबावाने अनेक ठिकाणी मतदानच सुरु न केल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या. काही ठिकाणी तहसीलदार आणि यंत्रणेला हाताशी धरुन भाजपनं मतदान यंत्रं मॅनेज केल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. भाजप खासदार चिंतामण वनगांचं निधन झाल्याने इथं पोटनिवडणूक होत आहे. मात्र वनगांचे पुत्र श्रीनिवास यांनी शिवसेनेची कास धरल्याने ही निवडणूक नाट्यमय झाली आहे. इथे बहुजन विकास आघाडीनं बळीराम जाधवांना तिकीट दिलं आहे. तर भाजपने शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना निवडणुकीत उतरवलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram