ब्रेकफास्ट न्यूज | पल पल किशोर | गायक अलोक काटदरे आणि राजेश अय्यर यांच्याशी खास गप्पा

अद्भुत गायक आणि संगीतकार किशोर कुमार यांच्या आठवणींना उजाळा देणारा सांगितीक कार्यक्रम २२ ऑगस्टला मुलूंडच्या कालिदास नाट्यगृहात रंगणार आहे. गायिकीचं कुठलंही प्राथमिक शिक्षण न घेतलेल्या किशोरदांच्या आवाजाने सगळ्यांनाच भूरळ घातली, जी आजच्या पिढ्यांवरही कायम आहे. रोमॅण्टिक गाणी असो की विरहाची, किशोरदांच्या आवाजाने ती अजरामर बनली.
किशोर कुमार यांच्या सदाबहार गाण्यांचा नजराणा पेश करणारा "पलपल किशोर" या कार्यक्रमाचं हे सहावं वर्ष असून जीवनगाणीने या कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे. प्रसाद महाडकर यांची ही निर्मिती असून अलोक काटदरे , राजेश अय्यर हे दोघे गायक किशोर कुमारांची एक से बढकर एक गाणी सादर करतील.
दोन गायक कलाकार, सलग तीन तास किशोर कुमारांच्या गाण्यांची मैफल असा हा कार्यक्रम किशोर कुमारांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने गायक अलोक काटदरे आणि राजेश अय्यर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola