ब्रेकफास्ट न्यूज : मराठमोळी दीपा आंबेकर न्यूयॉर्कमध्ये न्यायाधीशपदी
दीपा आंबेकर यांनी न्यूयॉर्कमध्ये मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे. न्यूयॉर्क महानगरातील क्रिमीनल कोर्टाच्या न्यायाधीशपदी दीपा आंबेकर यांची नियुक्ती झाली आहे. आंबेकर न्यूयॉर्कमधील पहिल्याच महाराष्ट्रीय, तर तिसऱ्या भारतीय स्त्री न्यायाधीश ठरल्या आहेत.