ब्रेकफास्ट न्यूज : पिकांना दीडपट हमीभाव, मोदींची हमी, FRP लवकरच जाहीर करणार!
खरीप हंगामात पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिली. इतकंच नाही तर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच्या निर्णयाला मंजुरी दिली जाईल, असं मोदींनी जाहीर केलं.
पंतप्रधान मोदींनी काल महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि कर्नाटकातून आलेल्या 140 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या भेटीत मोदींनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं.