ब्रेकफास्ट न्यूज : नवाज शरीफ मुलगी मरियमसोबत लंडनहून लाहोरला रवाना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2018 10:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पाकिस्तानच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शरीफ कुटुंबाला पाकिस्तान कोर्टानं मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ कन्या मरीयम शरीफसोबत लंडनहून लाहोरला रवाना झाले आहेत. पनामागेट भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने शरीफ यांना 10 वर्ष तर मरीयमला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आज लाहोरला पोहोचताच दोघांना अटक होणार असल्याची शक्यता आहे. तीनवेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या शरीफ यांना गेल्यावर्षीच कोर्टानं दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 6 जुलैला दोघांना शिक्षा सुनावण्यात आली.