ब्रेकफास्ट न्यूज : दंड म्हणून 10 हजारांची चिल्लर सोपवली, मोजता मोजता अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ

Continues below advertisement
प्लास्टिक बंदीच्या निर्णयावरुन मनपा कर्मचारी आणि व्यवसायिकांमध्ये खटके उडू लागले आहेत. कारवाईला कंटाळलेले व्यावसायिक कारवाई टाळण्यासाठी आता वेगवेगळे बहाणे शोधत आहेत. त्यातूनच नाशिकरोड परिसरात एका वाईनच्या दुकानात कारवाईसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना, व्यावसायिकाने चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर दिली. संबंधीत व्यावसायिकाला याआधी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. पुन्हा त्याच्याकडे प्लास्टिक सापडल्याने दंडाची रक्कम दुप्पट होऊन 10 हजार झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram